Asian Games 2023 
Latest

Asian Games 2023 | नौकानयन क्रीडा प्रकारात भारताला तिसरे कांस्यपदक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन ( SAILING) प्रकारात विष्णू सरवणनने भारताला तिसरे कास्यंपदक पदक मिळवून दिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये विष्णू सरवणनने पुरुषांच्या डिंगी ILCA7 सेलिंग इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकले. त्याच्या या अप्रतिम कामगिरीने भारताचा मान उंचावली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे २० वे पदक आहे. (Asian Games 2023)

24 फेब्रुवारी 1999 रोजी तामिळनाडू, भारतातील वेल्लोर येथे जन्मलेल्या सरवणन यांनी तरुणपणापासूनच नौकानयनाचा सराव सुरू केला. त्याने ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून आपला प्रवास सुरू केला आणि 2016 मध्ये तो युवा राष्ट्रीय चॅम्पियन बनला. याचवर्षी हाँगकाँग मालिकेत रौप्यपदक जिंकल्याने त्याचे यश कायम राहिले. त्यांची प्रतिभा आणि क्षमता ओळखून, 2017 मध्ये त्यांची भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Asian Games 2023)

पॅरिसमध्ये 2024 रोजी होणाऱ्या उन्हाळी ऑलिम्पिकची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. दरम्यामन १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, 2023 मध्ये विष्णू सरवणने कांस्यपदक पटकवले. या पार्श्वभूमीवर विष्णूच्या भविष्यातील कामगिरीसाठी ही कांस्यवेध पुढच्या स्पर्धांसाठी आशादायी ठरू शकतो. (Asian Games 2023)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT