मनामा (बहरीन); पुढारी ऑनलाईन : आशियाई क्रिकेट परिषद (ACC) पुढील महिन्यात आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण ठरवणार आहे. शनिवारी (दि.३) भारतीय क्रिकेट बोर्डचे (BCCI) सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांच्यात पहिली औपचारिक बैठक बहरीनमध्ये झाली. आशिया चषक यूएई किंवा श्रीलंकेत आयोजित केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. (Asia Cup 2023)
या वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे सोपवण्यात आले होते, परंतु ACC चेअरमन जय शाह यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही. असे मानले जाते की संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील तीन ठिकाणे दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे स्पर्धेचे आयोजिन केले जाऊ शकते. परंतु, तूर्तास याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पाकिस्ताना ही स्पर्धा न भरविण्यो कारण असे ही सांगितले जात आहे की, डॉलरच्या तुलनेत पाकिस्तान रुपयाची झपाट्याने घसरण होत आहे. अशा स्थितीत तेथे स्पर्धा आयोजित करण्यासाठी एसीसीला मोठा खर्च करावा लागणार आहे. (Asia Cup 2023)
या बैठकीला आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात स्वत:ला यजमान म्हणून सिद्ध करु शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागणीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती.
कतारने व्यक्त केली यजमानपदाची इच्छा
ACC अध्यक्ष आणि BCCI सचिव जय शाह यांनी यापूर्वी सांगितले होते की 2023 आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार नाही आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल. गेल्या वर्षी आशिया चषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि सलग दुसऱ्यांदा आशिया चषक येथे होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारनेही ही स्पर्धा आयोजित करण्यात रस दाखवला आहे. देशाने यापूर्वी काही क्रिकेट स्पर्धा आणि फ्रँचायझी आधारित क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. मात्र, कतारला यजमानपद मिळण्याची शक्यता कमी आहे.
अधिक वाचा :