Latest

Sri Lanka Team Nagin Dance : श्रीलंकेने 4 वर्षांनंतर घेतला ‘नागिन डान्स’ बदला, बांगलादेशची उडवली झोप (Video))

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sri Lanka Team Nagin Dance : आशिया चषक 2022 चा पाचवा सामना गुरुवारी रात्री श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. हा सामना 'करो या मरो' सारखा होता. वास्तविक, ब गटात दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना जिंकणारा संघच सुपर-4 मध्ये प्रवेश करणार होता. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चुरशीने खेळ करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. श्रीलंकेच्या दासुन शनाका संघाने रोमहर्षक सामना जिंकून सुपर 4 मध्ये संघाला प्रवेश करून दिला शिवाय बांगलादेशचा चार वर्षांपूर्वीचा 'नागिन डान्स' बदलाही पूर्ण केला. सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा खेळाडू चमिका करुणारत्ने नागिन डान्स करताना दिसला. 2018 च्या निदाहास ट्रॉफीमध्ये जेव्हा बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला तेव्हा त्यांच्या खेळाडूंनीही असाच आनंद साजरा केला होता.

आशिया चषक स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण सामन्यात बांगलादेशचा पराभव करून श्रीलंकेने चार वर्षांपूर्वीचा बदला घेतला आहे. 2018 मध्ये श्रीलंकेचा संघ निदाहास करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास मुकला होता. त्यावेळी सेमीफायनलमध्ये बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला होता. विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार नागिन डान्स केला होता. पण आता आशिया चषक स्पर्धेत सुपर-4 मध्ये जाण्यासाठीच्या रोमांचक लढतीत श्रीलंकेने बांगलादेशला पराभवाची धूळ चारत नाग डान्सचा बदला नागीन डान्स करून पूर्ण केला आहे. (Sri Lanka Team Nagin Dance)

दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 2 गडी राखून धुव्वा उडवला. यासह श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये प्रवेश केला. या पराभवासह बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळाडूंच्या संमिश्र कामगिरीच्या जोरावर शाकिब अल हसनच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. यादरम्यान अफिफ हुसैनने 39 आणि मेहदी हसन मिराझूने 38 धावांची सर्वाधिक खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने 19.2 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य विजयी गाठले आणि सामना जिंकला. श्रीलंकेसाठी कर्णधार शनाकाने (45) सलामीवीर कुसल मेंडिससह (60) शानदार खेळी साकारली. (Sri Lanka Team Nagin Dance)

विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना चढ-उतारांनी भरलेला होता. या सामन्यात कधी बांगलादेशचा तर कधी श्रीलंकेच्या संघाचा वरचष्मा राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ विकेट्स गमावत असताना प्रेक्षक गॅलरीतील चाहते श्रीलंकेच्या खेळाडूंची खिल्ली उडवत नागिन डान्स करत होते. पण अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवून त्यांच्या खेळाडूंनीही नागिन डान्स करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. खरेतर बांगलादेशने या सामन्यात अनेक नो बॉल फेकले आणि त्यामुळे अखेर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (Sri Lanka Team Nagin Dance)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT