aditi pohankar  
Latest

aditi pohankar : पम्मी पहेलवानने ओलांडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

आश्रम-३ (Ashram 3 ) वेबसीरीजमध्ये धमाल करणाऱ्या 'पम्मी पहेलवान'ला (aditi pohankar) नव्‍या परिचयाची गरज नाही. पम्मी पहेलवानची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहनकर हिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आश्रम मालिकेत भोळ्या मुलीची भूमिका साकारणारी पम्मी पहेलवान (aditi pohankar) तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटोज व्हायरल केले आहेत. तिचे लेटेस्ट फोटो पाहिले तर तिने तिच्या हॉट लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. (Ashram 3) आश्रम २ मध्ये तिने अनेक इंटिमेट सीन दिले होते, ज्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती. पण, रिअल लाईफमध्येही ती तितकीच ग्लॅमरस आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल की, खऱ्या आयुष्यातही अदिती इतकी बोल्ड आहे.


अदिती पोहनकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने न्हाईट कलरचा खूप सुंदर गाऊन परिधान केला आहे. अदितीने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिलीय. एका पाठोपाठ एक शेअर केलेल्या फोटोंना तिने Just in love with the white ! Ps – this is the last one – promise ! अशीही कॅप्शन लिहिलीय.

आणखी काही फोटोंमध्ये असे दिसते की, अदितीने क्रॉप टॉपवर डेनिम जॅकेट घातले आहे. तिचे मोकळे केस आणखी खुललेले दिसतात.

किलर लूकने चाहते थक्क झाले

आदिती पोहनकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळत आहे. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये इमोजींचा पाऊस पाडला आहे. एका यूजरने लिहिले, स्लीम वेस्ट. आणखी एका चाहत्याने कमेंट केली, चार्मिंग. कोणीतरी लिहिले, Hotness overloaded. त्याचप्रमाणे काही जण अदितीच्या डोळ्यांचे कौतुक करत आहेत तर काही जण तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत. आदिती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असल्याची माहिती आहे. तिचे एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट फोटो आहेत.

आश्रम या वेबसिरीजमध्ये आदिती पोहनकरने पम्मी या कुस्तीपटू मुलीची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने बॉबी देओलसोबत खूप इंटिमेट सीन्स दिले होते, पण त्याहीपेक्षा जास्त चर्चा झाली ती 'she' वेब सीरिजची. यामध्ये आदितीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या वेबसीरिजमध्ये आदितीने एका महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती, जिला एका डॉनला पकडण्यासाठी धोकादायक मोहिमेवर पाठवले जाते.

हेदेखील वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT