Ashish Shelar on Uddhav Thackeray 
Latest

Ashish Shelar on Uddhav Thackeray | ” भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…”; भाजपच्या आशिष शेलारांचे ट्विट चर्चेत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: "अजूनही सांगतोय…भोंदूगिरी सोडा आणि जय श्रीराम म्हणा…!" असा सल्ला देणारे भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे. शेलारांनी केलेल्या ट्विटर पोस्टमधून उद्धव ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray)

मंबाजी- तुंबाजी मातोश्रीत शिरलेत, तर…

शेलार यांनी म्हटले आहे की, गांजा, चिलीम ओढून "हग्रलेख" लिहिणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत. दरम्यान, मंबाजी- तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत. पत्रकार पोपटलाल यापैकी एकाची किंवा प्रसंगी दोघांची भूमिका पण चोख बजावत आहेत, अशी टीका शेलार यांनी उद्वव ठाकरे यांच्या गटावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन केली आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray)

तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आपलं "कुटुंब" सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत. तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा. देव, देश आणि धर्माची चिंता जनता करेल! तसेच अजून सांगतोय भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…तरच तुम्ही वाचाल नाहीतर शिल्लक राहिले तेवढे देखील संपून जाल असा प्रत्यक्ष इशारा देखील भाजपच्या ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT