Latest

Nehra Kicked Chahal : ‘IPL क्वालिफायर’पूर्वी आशिष नेहराने घातली युजवेंद्र चहलच्या पेकटात लाथ! (Photo Viral)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2022 म्हणजेच आयपीएलचा 15 वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. क्वालिफायर 1 चा सामना 24 मे रोजी कोलकाताच्या येथील ईडन गार्डन्स मैदानात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. त्यासाठी दोन्ही संघ कोलकात्यात पोहोचून जोरदार सराव केला. अशा स्थितीत गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि राजस्थानचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये नेहरा चहलला लाथ मारताना दिसत आहे. (Nehra Kicked Chahal)

यावर्षी आयपीएलच्या क्वालिफायर 1 च्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचे सराव सत्र एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये दोन्ही संघांचे खेळाडू, कोचिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ एकमेकांना भेटताना दिसले. (Nehra Kicked Chahal)

अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि राजस्थानचा घातक लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांचीही भेट झाली. दोघांमध्ये खूप हशा आणि विनोद झाला. या भेटीत असाही एक क्षण आला जेव्हा नेहरा चहलच्या पार्श्वभागावार लाथ मारताना दिसला. ही सगळी गंमत थट्टेने केली असली तरी. दोघांच्याही चेहऱ्यावरचे हास्य ते किती चांगल्या मूडमध्ये आहेत हे सांगत होते. (Nehra Kicked Chahal)

गुजरात टायटन्सने फोटो शेअर केले

आशिष नेहरा आणि युझवेंद्र चहल यांच्यातील गमतीशीर क्षणांचे फोटो गुजरात टायटन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकौंटवरून शेअर केले आहेत. 'युझी आणि नेहरा यांच्या या क्षणाचे साक्षिदार होताना खूप भारी वाटतंय,' असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे.

नेहरा आणि चहल जिथे कुठे असतील तिथे मजा-मस्ती नाही असे होणार नाही. ते चांगले मित्र आहेत. 24 मे रोजी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना असला तरी हे दोघे प्रतिस्पर्धी म्हणून आमनेसामने न येता एक मित्रत्वाच्या नात्याने एकत्र आल्याने चर्चा होत आहे.

दरम्यान, पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जाईल आणि जो संघ हरेल तो एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाविरुद्ध क्वालिफायर 2 खेळेल. (Nehra Kicked Chahal)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT