Asha Bhosale : टाॅम क्रूजने आशा भोसलेंच्या रेस्टाॅरंटमध्ये खाल्लं चिकन टिक्का ! 
Latest

Asha Bhosale यांच्या रेस्टाॅरंटमध्ये टाॅम क्रूजने खाल्लं चिकन टिक्का !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांनी सोमवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून टाॅम क्रूजने आपल्या रेस्टाॅरंटमध्ये जेवला असल्याचा आनंद व्यक्त केला. ८७ वर्षीय आशा भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टाॅम क्रूजचे फोटो शेअर केले. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मिशन : इम्पाॅसिबल'चा मुख्य अभिनेता, लिहिलं आहे.

टाॅम क्रूज या दिवसांत 'मिशन : इम्पाॅसिबल-७' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या बर्मिंघममध्ये होत असलेल्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. बर्मिंघम येथील न्यूहाॅल स्ट्रीटवर असणाऱ्या आशा भोसले यांच्या 'आशा' नावाच्या रेस्टाॅरंटमध्ये टाॅम क्रूजने जेवण केलं.

टाॅमने भारतीय जेवणाचे कौतुक केलेच, पण त्याचबरोबर रेस्टाॅरंटच्या मॅनेंजेरबरोबर फोटोदेखील काढला. आपल्या रेस्टाॅरंटमध्ये हाॅलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेता टाॅम क्रूज जेवायला आल्याचा आनंद आशा भोसले यांना झाला आहे.

आशा भोसले यांनी सोशल मीडियावर टाॅम क्रूजची फोटो शेअर केली. या फोटोमध्ये आशा भोसलेंचं रेस्टाॅरंट स्पष्ट दिसत आहे. टाॅम क्रूजबरोबर नौमान फारुकी यांच्या अन्य लोकसुद्धा दिसत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत आशादिदींनी लिहिलं आहे की, "मी ही बातमी ऐकून खूप आनंदी आहे की, आशा (बर्मिंघम) येथे जेवणचा आनंद घेतला. मी आशा करते की, ते पुन्हा यावेत"

टाॅम क्रूजने आशा भोसलेंच्या (Asha Bhosale) रेस्टाॅरंटमध्ये चिकन टिक्काचा आनंद घेतला. रेस्टाॅरंटचे मॅनेंजरनी सांगितलं की, टाॅम क्रूज हे आपल्या सुरक्षा रक्षकांसह रेस्टाॅरंटमध्ये आलेले होते. एक्स्ट्रा स्पाइस चिकन टिक्का त्यांनी दोन वेळा ऑर्डर केला. टाॅम क्रूज हे हाॅलिवुडमध्ये मागील ४० वर्षांपासून अभिनय करत आहेत. ते हाॅलिनुडचे सुपरस्टार आहेत. मिशन इम्पाॅसिबलच्या फ्रेंचाईजीच्या अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा मिळवली आहे.

पहा व्हिडीओ : एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज 'सोप्पं नसतं काही'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT