Latest

मोठी बातमी : स्‍वयंघोषित संत आसारामबापूला बलात्‍कार प्रकरणी जन्‍मठेप

नंदू लटके

गांधीनगर : पुढारी वृत्तसेवा : स्वयंघोषित संत आसारामबापू याला बलात्कारप्रकरणी आज ( दि. ३१ ) जन्‍मपेठेची शिक्षा सुनावण्‍यात आली. या प्रकरणी मंगळवारी ( दि. ३०) त्‍याला गांधीनगर अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने दोषी ठरवले होते. आसारामची ही दुसरी शिक्षा आहे. 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी त्‍याला जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या ८१ वर्षीय आसामरामबापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ( Asaram Bapu held guilty )

२०१३ मध्‍ये जोधपूरमध्ये  'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.  या कारवाईनंतर आणखी एक पीडितेने तक्रार केली. 1997 ते 2006 दरम्यान अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमात तिच्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप केला. पीडितेच्या लहान बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्‍काराचा आरोप केला.

2016 मध्येही सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर एकामागून एक आसारामची गुन्‍हेगारी उघड झाली. आसारामच्या आश्रमात तांत्रिक विधी होत असत, यासाठीच २००८ मध्ये दोन मुलांची हत्या करण्यात आल्‍याचा आरोपही त्‍यावेळी झाला होता. मात्र, याप्रकरणी ठोस पुरावे मिळाले नाहीत. आसाराम व त्‍याचा मुलगा नारायण साई याच्‍यावर अनेक जमिनी जबरदस्तीने हडप केल्याचाही आरोप झाला. पांढर्‍या कपड्यामधील या स्‍वयंघोषित संताच्‍या कृत्‍याने सारा देश हादरला होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT