File Photo  
Latest

नागपूर : मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच खात्‍यातील साडेअकरा लाख रुपयांवर डल्ला !

अनुराधा कोरवी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही लिंकवर माहिती न घेता क्लिक करू नका, मेसेजेसमध्ये मागितलेली माहिती देऊ नका, अशा सूचना सायबर पोलिसांकडून वारंवार दिल्‍या जात असल्‍या लोक मोहात पडतातच. असे मोहात पडणे अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विश्वकर्मा नगरातील नितीन नरेश लांबसोगे यांना भलतच महागात पडले आहे. मोबाईलवर आलेल्या लिंकवर विश्वास ठेवून त्‍यांनी क्लिक केले. यानंतर त्यांना आपल्‍या बँक खात्‍यातून  साडेअकरा लाख रुपये गमवावे लागले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नितीन लांबसोगे यांच्या मोबाईलवर बी. डब्ल्यू. सेक्टरवरून "यू आर सिलेक्टेट फॉर पार्ट टाईम वर्क फॉर होम ॲण्ड इन्व्हेस्टमेंट' असा मेसेज आला. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर लांबसोगे यांनी क्लिक केले.  यानंतर त्यांच्या खात्यातून ११ लाख ६३ हजार ६०० रूपये आरोपीच्या खात्यात जमा झाले. ही माहिती नितीनला समजल्यानंतर अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT