मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील संशयित आराेपी, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Aryan Khan drug case ) याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. त्यामुळे आता आर्यन खानचा मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच राहणार आहे.
मागील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी दोन दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करत बुधवार जामीन अर्जावरील सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र बुधवारी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने यावर गुरुवारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. गुरुवारीही दाेन्ही बाजूंनी जाेरदार युक्तीवाद झाला. अखेर न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय २० ऑक्टोबरपर्यंत राखीव ठेवला.
यावेळी एनसीबीच्या वकिलांनी जामीन मंजुरीला विरोध केला. . 'एनसीबी'च्या वतीने युक्तीवाद करताना वकील अनिल सिंह म्हणाले की, आर्यन खान मागील काही वर्षांपासून ड्रग्जचे नियमित सेवन करत होता. तसेच त्याने विदेशातील ड्रग्जचे सेवन केले आहे. असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे चरस सापडले होते. अरबाज आणि आर्यन याचे सेवन करणार होते, असा जबाब अरबाज याने दिला आहे. त्यामुळे आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाहीत, हा युक्तिवाद योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शोविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी एनडीपीएस कायद्यातील सर्व गुन्हे ह अजामीनपात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपींना जामीन देणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
क्रुझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह अन्य पाचर आरोपींची कोरोना चाचाणी अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर या सर्वांची रवानगी क्वारंटाईन बराकमधून कॉमन रेलमध्ये पाठवण्यात केले आहे, अशी माहिती आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.