Latest

Arun Gandhi Funeral Date : अरुण गांधी यांच्यावर कोल्हापुरातील वाशी येथे आज अंत्यसंस्कार | Arun Gandhi Funeral Date

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२)  कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कोल्हापुरात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्या संमतीने वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड) येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या वेळेत अंत्यसंस्कार होणार आहेत. (Arun Gandhi Death in Kolhapur), (Arun Gandhi Funeral schedule in Kolhapur)

अरुण गांधी हे भारतीय-अमेरिकन शांतता कार्यकर्ते, वक्ता आणि लेखक होते, जे त्यांच्या अहिंसा आणि सामाजिक न्यायाच्या वकिलीसाठी ओळखले जात. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला आणि ते मोहनदास करमचंद गांधी यांचे पाचवे नातू आहेत, ज्यांना महात्मा गांधी म्हणूनही ओळखले जाते. ब्रिटीश औपनिवेशिक राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या अहिंसक लढ्याचे ते नेते होते. दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या अरुण गांधींनी वर्णभेद आणि पृथक्करण, तसेच भारतीय स्थलांतरितांविरुद्ध भेदभाव आणि हिंसाचार यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. १९४६ मध्ये, जेव्हा ते बारा वर्षांचे होते, ते त्यांच्या आजोबांसोबत (महात्मा गांधी) राहण्यासाठी भारतात आले, जे त्यांचे गुरू आणि अहिंसा आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर वचनबद्धतेसाठी प्रेरणा बनले.

फेब्रुवारी २०२३ मध्ये, अरुण गांधी यांनी अवनी होम फॉर गर्ल्सला भेट दिली. परंतु दुर्दैवाने त्यांची तब्येत अचानक खालावली आणि ते परत जाऊ शकले नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी त्यांच्या इच्छेनुसार अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते. अरुण गांधी यांचे पुत्र तुषार व त्यांचे नातेवाईक यांच्या संमतीने अरुण गांधी यांच्यावर वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड, येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या वेळेत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे पुत्र तुषार गांधी कोल्हापुरला येण्यास निघाले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT