हिंगोली; पुढारी वृत्तसेवा – पोलीस म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. विशेषतः गुन्हेगारांना… त्याचबरोबर पोलिसांची वर्दी बघितली की लहान मुलेही घाबरत असतात. अनेक वेळा पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रारदाराच्या सोबत आलेले लहान मुल भीतीच्या सावटाखाली असते. मात्र ही त्यांना हि भीती वाटू नये यासाठी हिंगोली पोलीसांनी पुढाकार घेत एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. (Child Friendly Police Station)
पोलीस प्रशासनाने हिंगोली जिल्ह्यात पहिल्यादांच चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती केलीय. त्या स्टेशनचे उद्घाटन आज नांदेड परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत त्यांची मुलेही येत असतात. तर काही ठिकाणी लहान मुलांचा वापर करुन चोरीही केली जाते. अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात, तेव्हा पोलिसांबद्दल त्यांच्या मनात भिती असते.
तसेच, कुटुंब कलाहामुळे मुलांच्या मनावरही त्याचे विपरीत परिणाम होत असतात. अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा त्याच्या मनावरील दडपण कमी व्हावे यासाठी चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलीय. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागार पोलीस यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाविन्यपुर्ण योजना पुर्णत्वास आली. (Child Friendly Police Station)
शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हे स्टेशन सुरु करण्यात आले. या स्टेशनच्या भिंतीवर विविध कलाकृती साकारुन रंगविण्यात आल्या आहेत. तसेच, खेळणी, खुर्च्या, टेबल, पुस्तकंही ठेवण्यात आली आहेत. या स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या इथे येणाऱ्या मुलांचे मनोधैर्य वाढविणार आहे.
पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उद्घाटन प्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा