Anushka - Virat Anniversary 
Latest

Anushka – Virat Anniversary : अनुष्का- विराटच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस; फोटोतून सांगितली 5 वर्षांची प्रेम कहानी…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क ; बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच सध्या दोघांच्या लग्नाला पाच वर्ष उलटले आहेत. यामुळे अनुष्का- विराटने ( Anushka – Virat Anniversary ) एकमेंकाना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक-एक फोटो शेअर केला आहे. पहिल्यांदा अनुष्काने लग्नाच्या वाढदिवसाच्या विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनुष्का सात फोटो अपलोड केले आहेत. पहिल्या फोटोत विराट-अनुष्का ब्लॅक रंगाच्या कपड्यात निराश अवस्थेत आहेत. दुसऱ्या फोटोत दोघेजण सोफ्यावर बसलेले असून विराट हसताना दिसला. तिसऱ्या फोटोत अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या काळात विराट बेडवर झोपलेला दिसतोय. चौथ्या फोटोत दोघे कपल चहाच्या कपावर एकमेंकाच्यासोबत दिसतात.

पाचव्या फोटोत विराट तर सहाव्या फोटोत अनुष्का हसताना आणि शेवटच्या सातव्या फोटोत दोघेजण पाण्याच्या झऱ्याजवळ हसताना सेल्फी घेताना दिसलेत. वरील सर्व फोटोत विराट आणि अनुष्काच्या ५ वर्षातील प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनुष्काने या सातही फोटोच्या कॅप्शनमध्ये 'What better day than today to post these lovely pictures to celebrate us, my love! ❤️'. असे लिहिले आहे.

अनुष्काच्या या फोटोनंतर विराटनेही दोघांचा एक फोटो शेअर करत अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटने '५ years on a journey for eternity. How blessed Iam to find you , I love you with all my heart ❤️♾️❤️♾️❤️' असे म्हटलं आहे. विराटच्या या फोटोवर अनुष्काने रिट्टिविट करत विराटचे आभार मानले आहेत. यात तिने 'Thank god you didn't go for 'payback' post ??❤️' असे म्हटलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी दोघांवर शुभेच्छा वर्षाव केलाय. ( Anushka – Virat Anniversary )

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT