Indian Idol Marathi  
Latest

‘इंडियन आयडल मराठी’ : गायिका अनुराधा पौडवाल यांची एन्ट्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोनी मराठी वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले आहेत. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होत आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. आता या शोमध्ये अनुराधा पौडवाल यांची एन्ट्री होणार आहे. या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी अनुराधा पौडवाल येणार आहेत.

सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. या स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. ग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाला आहे.

या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी, स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून येणार आहेत. यावेळी त्यांना घरी परत आल्यासारखं वाटलं असं त्या म्हणाल्या.

पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमीळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातल्या एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचं पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झालं.

त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते आणि भजने यांचे गायन ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून त्या करताहेत.

पौडवाल यांचा वरदहस्त स्पर्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला लाभणं ही स्पर्धकांसाठी भाग्याची गोष्ट ठरली आहे. ज्यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होतं अशा लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं 'इंडियन आयडल मराठी' ह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.

फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आणि त्यात पौडवाल यांना नक्की बघा. पाहा, 'इंडियन आयडल मराठी', १३ आणि १४ डिसेंबर, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT