Latest

Imran Khan Arrest : इम्रान खान यांच्याविरूद्ध आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयाने आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी इस्लामाबाद पोलिसांची टीम इस्लामाबादमधून लाहोरला पोहोचली आहे. त्यामुळे इम्रान खान यांना पुढच्या २४ तासांत कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली.

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.१३) त्यांच्या हजारो समर्थकांनी लाहोरमध्ये मोर्चा काढला. याप्रसंगी खान यांच्या समर्थकांनी त्यांना दाता दरबारात घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. दरम्यान खान यांच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आली. यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी आता थेट लाहोर गाठले असल्याचे पाकिस्तानी मीडियाकडून समजत आहे.

याप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत दोन प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामध्ये तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्याने आणि गेल्यावर्षी 20 ऑगस्ट 2022 रोजी एका जाहीर सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल खान यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

या अटक वॉरंटला दोन आठवड्यांची स्थगिती

यापूर्वी राज्यसंस्थांविरुद्ध जनतेला भडकावण्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट दोन आठवड्यांसाठी कोर्टाने स्थगित केले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना कार्टाने तात्पुरता दिलासा मिळाला होता.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT