Sonam Kapoor 
Latest

Sonam Kapoor : अनिल कपूरचा नातू सहा महिन्याचा; वायुच्या क्युटनेसवर बिपाशा फिदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने ( Sonam Kapoor ) ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. या काळात सोमन सिनेझगमटापासून दुर राहिली. इतकेच नाही तर ती सध्या पालकत्वाचा मननुराद आनंद घेत आहे. सोमनने तिच्या मुलाचे नाव 'वायु' (Vayu) असे ठेवले आहे. सोमनसोबत कपूर कुटूंबियाकडून वायुचे चांगली देखभाल आणि काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान सोनमने तिचा मुलगा ६ महिन्याचा झाल्याने एक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोनम कपूरने ( Sonam Kapoor ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्वत: आणि 'वायु' (Vayu) सोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील एका फोटोत सोनम येलो कलरच्या लायनिंग आउटफिटमध्ये असून तिच्या माडीवर वायु बसलेला दिसतोय. तर सोनम वायूला छोटा बॉल देऊन त्याला खेळवण्यात गुंतलेली दिसतेय. यातील दुसऱ्या व्हिडिओत वायू व्हाईट कलरच्या कुर्ता पायजामामध्ये जमिनीवर उलटा झोपलेला दिसत आहे. तर वायुच्या आजूबाजूला खुपसारी खेळणी दिसतात.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने '6 months of my Vayu. The best job in the world.. my biggest blessing.. love you my darling boy.. your papa and me couldn't have asked for more'. असे लिहिले आहे. तर #6monthsold #6monthspostpartum #vayusparents #everydayphenomenal असे हॅसटॅग दिले आहेत. यावरून सोनमचा मुलगा आणि अनिल कपूरचा नातू सहा महिन्याचा झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोनमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोनी राजदान, भावना पांडे, बिपाशा बसु, कनिका मान आणि जोया अख्तर यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याच दरम्यान नुकतेच आई बनलेल्या बिपाशाने या फोटोवर 'गॉड ब्लेस यू माय क्यूटी' असे लिहिले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT