मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली ते ५२ वर्षांचे होते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडूण आले होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
आमदार रमेश लटके हे आपल्या परिवारासोबत दुबई येथे गेले होते. तेथील हॉटेलच्या रुममध्ये ते एकटे असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे.