File Photo 
Latest

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंची निर्णायक आघाडी; १३ व्या फेरी अखेर ४८ हजार १५ मते

मोहन कारंडे

मुंबई उपनगर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधाfनसभेच्या '१६६-अंधेरी पूर्व' मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गटाच्या ऋतुजा लटके पहिल्या चार फेऱ्यांमध्ये मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. त्यांना १३ व्या फेरी अखेर ४८ हजार १५ मते मिळाली आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये मतमोजणी सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि सात अपक्ष यांच्यामध्ये असलेल्या लढतीचा अंतिम निकाल दुपारपर्यंत लागण्याचा अंदाज आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून  कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

१३ व्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते :

ऋतुजा लटके – ४८०१५

नोटा – ९५४७

एकूण मतमोजणी – ६३१४७

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT