Latest

व्‍वा..! जबरदस्‍त क्रिएटिव्हीटी! आनंद महिंद्राही भारावले (पाहा व्‍हिडिओ)

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर लक्षवेधी व्‍हिडिओ शेअर करत असतात. त्‍यांनी शेअर केलेले व्‍हिडिओ नेहमी चर्चेत असतात. आज (दि.२७) त्‍यांनी एक हटके व्‍हिडिओ शेअर करत नेटकर्‍यांना एका कलाकारामधील कल्पकता (क्रिएटिव्हीटी) कोठेही साकारता येते, फक्‍त सकारात्‍मक दृष्‍टीकोन असावा, असा अप्रत्‍यक्ष संदेशच त्‍यांनी दिला आहे. (Anand mahindra reacts on Artists)

आनंद महिंद्रा यांनी प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर लक्षवेधी व्‍हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये वाहनांवरील धुळीमध्‍ये प्रतिमा रेखाटना कलाकार दिसत आहे.

Anand mahindra reacts on Artists : असे कलाकार सर्वत्र मिळायला हवेत

महिंद्रा यांनी हा व्‍हिडिओ शेअर करत म्‍हटलं आहे की, "हे भारत आहे असे दिसते?. येथे धुळीने माखलेल्या गाड्यांची कमतरता नाही!. काय प्रतिभा. असे कलाकार सर्वत्र मिळायला हवेत. खऱ्या कलाकारांसाठी, जगातील प्रत्येक वस्तू त्यांच्या अभिव्यक्तीचा कॅनव्हास आहे."

काही दिवसांपूर्वीच आनंद महिंद्रा यांनी ७०० रुपयांना थार विकत घेणार असल्‍याचे सांगणार्‍या चिमुरड्या चीकू यादवचा व्‍हिडिओ शेअर केला होता. तसेच त्‍याला खुसखुशीत उत्तर म्‍हटलं होतं की, मी इन्स्टा (@cheekuthenoidakid) वर त्याच्या या चिमुरड्याच्‍या काही पोस्ट पाहिल्या. आता मला त्याच्यावर खूप प्रेम आहे. माझी एकच अडचण आहे की जर आम्ही त्याचा दावा प्रमाणित केला आणि 700 रुपयांना थार विकले तर आम्ही लवकरच दिवाळखोर होऊ,"

चिमुरड्याचा व्‍हिडिओ या वर्षी जुलैमधील आहे. चीकूच्या वडिलांनी आपल्‍या इंस्टाग्राम पेजवर तो शेअर केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या क्लिपला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चीकूच्‍या निरागस मागणीवरही नेटकर्‍यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिक्रिया देत त्‍यांचे कौतुकही केले आहे. त्याला थार आणि XUV 700 साठी चाइल्ड ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याचा विचार करा," अशी मागणीही एकाने केली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT