Anand Mahindra  
Latest

Anand Mahindra : “हे पाहणे फारच वेदनादायी…”आनंद महिंद्रांची पोस्‍ट चर्चेत

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर सक्रिय असलेले उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी आपल्या 'X' अकाऊंटवर  ट्रेंडिग, हटके अशा पोस्ट करत असतात. नुकतीच त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे. "हे पाहणे फारच वेदनादायी…" तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होवू लागला आहे. पाहा त्या व्हिडिओमध्ये काय आहे. (Anand Mahindra)

Anand Mahindra : "हे पाहून त्रास होतो"

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवर 'गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात दोन पुरुष कचरा आणि पिशव्या ओतताना दिसत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, "हे पाहून त्रास होतो". आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर सोशल मीडियावरुन संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. सोशल मीडियावरुन अरबी समुद्रात कचरा ओतणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकारात्मक नागरी वृत्तीला प्राधान्य देणे आणि वाढवणे आवश्यक

या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी पुरुषांवर कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, "नक्कीच, शहराचा आत्मा केवळ त्याच्या संरचनेत नसून तेथील लोकांच्या मानसिकतेत असतो. लोकांच्या वृत्ती, जबाबदारी आणि अभिमानामध्ये सामूहिक बदल शहराच्या जीवनाचा दर्जा खरोखरच उंचावू शकतो. येथे सकारात्मक बदलाची आशा आहे!" एका युजरने कमेंट केली आहे की,"कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सर्व शहरांमध्ये सुलभ प्रवेशाची व्यवस्था केली जावी आणि लोकांना टीव्ही, सोशल मीडिया आणि होर्डिंगद्वारे कचरा विल्हेवाट लावण्यासाठी शिक्षित केले जाणे आवश्यक आहे. सरकारने हे निराकरण करण्यासाठी पुरेशी संसाधने खर्च केली पाहिजेत जसे त्यांनी UPI/ लागू केले. डिजिटल पेमेंट लागू केले." आणखी एक युजर म्हणत आहे की,"शहरातील चांगल्या दर्जाच्या जीवनासाठी व्यक्ती आणि समुदायाने सकारात्मक नागरी वृत्तीला प्राधान्य देणे आणि वाढवणे आवश्यक आहे."
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलिसांनी अरबी समुद्रात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला त्यानंतर त्यांची ओळख पटली. त्याचा शोध घेतल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०,००० रुपयांचा दंड ठोठावला.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT