पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भूसुरुंगाच्या स्फोटात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला तर दुसरा जखमी झाला. ८ व्या इन्फंट्री ब्रिगेड अंतर्गत १७ व्या शीख लाइट बटालियनची जबाबदारी (AOR) असलेल्या क्षेत्रात फॉरवर्ड डिफेन्स लाइन (FDL) पासून सुमारे ३०० मीटर अंतरावर सकाळी १०:३० वाजता ही घटना घडली.
हा स्फोट झाला तेव्हा लष्कराचे दोन जवान नियंत्रण रेषेजवळ नियमित गस्त घालत होते. या स्फोटानंतर दोन्ही जवानांना तातडीने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या जखमींपैकी एक जवान शहीद झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.
लष्कराने अद्याप शहीद जवानाचे अथवा जखमी जवानाचे नाव अद्याप सांगितलेले नाही.
हे ही वाचा :