Amruta Khanvilkar 
Latest

Amruta Khanvilkar : मला लिफ्ट देशील का? अमृताच्या अदांवर ‘तो’ फिदा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट 'मुंबई सालसा' चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणारी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे. ब्ल्यू कलरच्या शिमर हाय स्लिट गाऊनमध्ये अमृता खानविलकरने फोटोशूट केलं आहे. गाडीतून उतरताना आणि गाडीमध्ये बसल्यानंतरचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिला मला लिफ्ट देशील का? अशी मिश्किल कमेंट दिलीय. (Amruta Khanvilkar)

अमृताच्या या फोटोतील प्रत्येक अदा घायाळ करमाऱ्या असून तिने पुन्हा एकदा आपल्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. हाय स्लिट गाऊनमध्ये अमृता खूप सुंदर दिसतेय. ब्ल्यू कलर शिमर वनपीसवर वाईट मेकअप आणि पिंक लिपस्टिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृताला चाहते स्टनिंग, सुंदर, किलींग म्हणत आहेत. मराठी चित्रपट ते बॉलिवूडपर्यंत अमृताचा दमदार प्रवास आहे.

फूंक, गोलमाल, शला, कांट्रैक्ट, रंगून, राजी यासारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. याशिवाय ती वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये दिसबी होती. कट्यार काळजात घुसली, चंद्रमुखी, हर हर महादेव, चंद्रमुखी, चोरीचा मामला, मलंग, बाजी, पाँडेचेरी अशा चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनय़ाची झलक दाखवलीय.

चित्रपटांसोबतचं अमृता नच बलिए ७ आणि झलक दिखला जा ८ मध्ये आपल्या दमदार डान्स शोने सर्वांची मने जिंकली होती.दरम्यान, अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील गाणे चंद्रा गाणे खूप हिट ठरले होते.

चित्रपट करिअर

अमृताने आपल्या दमदार करिअरमध्ये 'फूंक', 'गोलमाल', 'शाळा', 'कांट्रैक्ट', 'रंगून' और 'राजी' सह एकापेक्षा एक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT