अमित शहा 
Latest

PFI कार्यकर्त्यांवर छापेमारी दरम्यान अमित शहा यांची उच्चस्तरीय बैठक, अजित डोवाल यांची उपस्थिती

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : एनआयए आणि ईडी यांनी संयुक्त रित्या गुरुवारी सकाळी 11 राज्यांमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांच्या घर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. देशातील दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यात गुंतलेल्या 106 पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) कार्यकर्त्यांना अटक केली. एनआयएचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे तपास ऑपरेशन असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय अधिका-यांची बैठक घेतली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशिवाय केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, नॅशनल एजन्सीचे महासंचालक दिनकर गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या आवारात टाकण्यात आलेले छापे आणि दहशतवादी संशयितांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीद्वारे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशभरातील दहशतवादी संशयित आणि पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि तिची राजकीय शाखा सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) वर छापे NIA आणि ED यांच्याशी सल्लामसलत करून इंटेलिजन्स ब्युरोने सखोल तपास आणि डेटा संकलनाच्या आधारावर टाकले आहेत.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) हे सुरुवातीपासून गृह मंत्रालयाचे लक्ष होते कारण गुप्तचरांची माहिती दर्शवते की कट्टरवादी इस्लामी संघटना पश्चिम आशियाई देशांमध्ये, विशेषत: कतार, कुवेत, तुर्कीमध्ये सापडली आहे. तसेच पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून बेकायदेशीरपणे आर्थिक मदत केली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा निधी देशभरातील दहशतवादी कारवायांसाठीच नव्हे तर तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी वापरला जात होता. या संघटनेचे मुस्लिम ब्रदरहूड सारख्या सर्व-इस्लामिक संघटनेशी संबंध होते आणि भारतातील इस्लामचा चेहरा बनण्याची त्यांची योजना होती. PFI-SDPI चे मुख्य नेतृत्व मूलत: बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे आहे, ज्याचा मुख्य उद्देश भारतात इस्लामिक खिलाफत स्थापन करणे हा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT