NIA : एनआयए आणि ईडीची संयुक्त कारवाई, महाराष्ट्रासह देशभरातील PFI च्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात

NIA : एनआयए आणि ईडीची संयुक्त कारवाई, महाराष्ट्रासह देशभरातील PFI च्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ( NIA )आणि अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी सकाळी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये देशव्यापी छापे टाकून अतिरेकी इस्लामिक संघटना PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जवळपास 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, ज्यात त्यांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

अंमलबजावणी संचालनालय आणि राज्य पोलिसांसह राष्ट्रीय तपास संस्थेने 10 राज्यांमध्ये सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेत हे शोध घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पीएफआय नेत्यांपैकी केरळमधून 22, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 20, तामिळनाडूमध्ये 10, आसाममध्ये 9, उत्तर प्रदेशमध्ये 8, आंध्र प्रदेशमध्ये 5, मध्य प्रदेशमध्ये 4, तर दिल्ली आणि पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी 3 जणांना पकडण्यात आले. तसेच राजस्थानमधील दोघांना ताब्यात घेतले आहे.

केरळमध्ये पीएफआयच्या चार मोठ्या नेत्यांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. पीएफआय कार्यालये आणि नेत्यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे पूर्ण झाले आहे. कारवाईत पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम, केरळ राज्य प्रमुख सीपी मोहम्मद बशीर, राष्ट्रीय सचिव व्हीपी नजरुद्दीन आणि राष्ट्रीय परिषद सदस्य प्रा. पी कोया यांना ताब्यात घेण्यात आले.

NIA आणि ED मध्यरात्रीपासून पीएफआय राज्यातील, जिल्हास्तरीय नेत्यांच्या घरांवर छापे टाकत आहे. ओएमए सलाम यांच्या घरासह, पीएफआय चेअरमन, मंजेरी, मलप्पुरम जिल्ह्यातील आणि पीएफआय कार्यालयांवर मध्यरात्रीपासून छापे सुरू होते.

एनआयए तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसामसह 10 राज्यांमध्ये पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर शोध घेत आहे. एनआयए, ईडीसह राज्य पोलिसांनी पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तामिळनाडू एनआयए मदुराई शहरातील विलापुरम, गोमतीपुरमसह 8 ठिकाणी शोध घेत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) पूर्णिया येथील पीएफआय कार्यालयाची झडती घेत आहे. एनआयए तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसामसह 10 राज्यांमध्ये पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर शोध घेत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) संपूर्ण महाराष्ट्रात PFI शी संबंधित अनेक ठिकाणी शोध घेत आहे.

दहशतवादी फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना कट्टरपंथी बनवणे यामध्ये कथितरित्या सहभागी असलेल्या लोकांच्या घरात दहशतवादविरोधी शोध घेण्यात आले.

केंद्रीय तपास एजन्सीने सध्या सुरू असलेल्या छाप्यांमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतात होत असलेली "आतापर्यंतची सर्वात मोठी" तपास प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे.

1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंसानंतर सुरू झालेल्या तीन मुस्लिम संघटनांच्या विलिनीकरणानंतर PFI 2006 मध्ये केरळमध्ये सुरू करण्यात आले. या तीन संघटना म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तमिळनाडूच्या मनिथा नीथी पासारी होय.

पीएफआय वर भडकाऊ भाषण करणे, तसेच कर्नाटकच्या हिजाब प्रकरण आणि अन्य वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये PFI वर आरोप ठेवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news