File Photo  
Latest

PM Modi’s Speech : स्वातंत्र्यदिनी PM मोदींचे भाषण ऐकण्यास अमेरिकेचे ‘द्विपक्षीय संसदीय शिष्टमंडळ’ येणार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi's Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेतून द्विपक्षीय संसदीय शिष्टमंडळ येणार आहे. या मंडळाचे नेतृत्व भारतीय अमेरिकी खासदार रो खन्ना आणि खासदार माइकल वाल्ट्ज हे करणार आहेत. खन्ना आणि माइकल दोघेही 'काँग्रेसनल कॉकस ऑन इंडिया अँड इंडियन अमेरिकन्स'चे सह-अध्यक्ष आहेत, जी यूएस हाऊसमधील देशातील सर्वात मोठी द्विपक्षीय युती आहे.

PM Modi's Speech : तंत्रज्ञ-व्यावसायिक आणि बॉलिवूड कलाकारांची भेट घेणार

हे अमेरिकन खासदार प्रथम लाल किल्ल्याचा दौरा करतील. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. याशिवाय हे शिष्टमंडळ हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथील व्यावसायिक, तंत्रज्ञ, सरकार आणि बॉलीवूड कलाकारांची भेट घेतील. तसेच दिल्ली येथील महात्मा गांधींना समर्पित ऐतिहासिक स्मारक राजघाटचा दौरा करणार आहेत.

PM Modi's Speech : खन्ना यांच्यासाठी भारतभेट ठरणार विशेष

शिष्टमंडळाचे नेतृत्व सांसद रो खन्ना आणि वाल्टज हे करणार असून या शिष्टमंडळात सांसद डेबोरा रॉस, कैट कैममैक, श्री थानेदार, जैस्मीन क्रॉकेट यांच्यासह रिच मैककॉर्मिक आणि एड केस हे सामिल होणार आहेत. तर सांसद खन्ना यांच्यासाठी ही भारत भेट खूपच खास असणार आहेत. कारण त्यांचे आजोबा अमरनाथ विद्यालंकार हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. अमरनाथ यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत चार वर्ष तुरुंगात काढले होते. नंतर ते भारताच्या पहिल्या संसदेचा देखील भाग होते.

याविषयी खन्ना म्हणाले की, इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष म्हणून भारतात द्विपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. या काळात दोन्ही देशांमधील आर्थिक आणि संरक्षण संबंध कसे मजबूत करता येतील यावरही चर्चा करू, असे ते म्हणाले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT