Latest

Paris Hilton : अमेरिकन अभिनेत्री पॅरिस हिल्टन भारत दौऱ्यावर; मुंबईत दाखल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टन (Paris Hilton) सध्या भारतात आहे. पॅरिस हिल्टन बुधवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर पोहचली. तिला तेथे पाहताच चाहत्यांनी घेरले. पॅरिस हिल्टननेही चाहत्यांना निराश केले नाही आणि त्यांच्यासोबत अनेक सेल्फी काढले.

पॅरिस हिल्टनचे भारतात पोहचल्यानंतरचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे चर्चेत आहेत. हिल्टन चाहत्यांच्या प्रचंड गर्दीकडे हात हलवताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे.

पॅरिस हिल्टन भारतात येण्याची ही चौथी वेळ आहे. काही वर्षांपूर्वी ती तिच्या फॅशन ब्रँडची चेन लॉन्च करण्यासाठी भारतात आली होती. पॅरिस हिल्टन एका नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात मुंबईत आली असल्याची चर्चा देखील आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्या हातात पोर्टेबल फॅन देखील दिसून आला. ज्यामुळे हिल्टनचा हा लुक पाहून चाहत्यांना तिच्याससोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

पॅरिस हिल्टन ही सलमान खानची फॅन

पॅरिस हिल्टन ही सलमान खानची फॅन आहे. काही वर्षांपूर्वी, ती सलमान खानसोबत एका पार्टीत दिसली होती, त्यावेळेस 'भारत' या चित्रपटातील सलमानचा लूक प्रदर्शित झाला. तेव्हा पॅरिसने त्याचे खूप कौतुक केले. 2014 मध्ये हिल्टन तिच्या एका कामानिमित्त भारतात आली होती. तेव्हा पुण्यातील एका पार्टीदरम्यान तिची आणि सलमान खानची भेट झाली होती.

भारतीय संस्कृती आणि लोकांबद्दलची तिची प्रशंसा

पॅरिस हिल्टनने एका मुलाखतीत सांगितले की, तिचे भारतावर खूप प्रेम आहे. तिला इथली लोकं, संस्कृती आणि खाद्यपदार्थ इतकी आवडतात की तिला पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल. हिल्टन २०११ मध्ये भारतात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आली त्यानंतर तिच्या देशात ती परतली. त्यावेळी तिने भारताचे खूप कौतुक केले. त्यानंतर हिल्टनने तिच्या ट्विटर अकाऊंटवर देखील लिहिले होते की, तिची भारत भेट अप्रतिम होती. येथील जेवण अतिशय चवदार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT