Latest

IPL 2023 Final Amabati Rayudu : “म्‍हातारा झाल्‍यानंतरही आजची खेळी…” धोनी रायडूला नेमकं काय म्‍हणाला?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. चेन्‍नईने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. रायुडूने गुजरातविरुद्ध दडपणाखाली एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आठ चेंडूंत 19 धावांची खेळी खेळली. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर तिन्ही चौकार लगावले आणि चेन्नई संघावरील दबाव कमी केला. फायनल सामन्‍यापूर्वी निवृत्ती जाहीर करणा्‍या अंबाती रायडू आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांमध्‍ये सामना जिंकल्‍यानंतर खास चर्चा झाली. यावेळी महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले. ( IPL 2023 Final Amabati Rayudu )

सामना जिंकल्‍यानंतर बोलताना रायडू म्‍हणाला, जेव्हा शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावांची गरज होती, तेव्हा आम्ही सर्वजण डगआउटमध्ये देवाची आठवण करत होतो. आमच्‍यासाठी हा विजय स्‍वप्‍नवत होता. हे अविश्वसनीय आहे. या लीगमधील काही सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध मला खेळायला मिळाले याबद्‍दल मी स्‍वत:ला भाग्यवान समजतो. हा विजय माझ्‍यासाठी आयुष्‍यभर स्‍मरणीय राहिल. फायनलमधील विजयाने माझ करिअरला पूर्णविराम मिळाला याचा मला विशेष आनंद आहे. मी माझ्या कुटुंबासह विशेषत: माझ्या वडिलांचे आभार मानतो. त्‍यांच्‍यामुळेच मी येथे आहे.

IPL 2023 Final Amabati Rayudu : धोनी रायडूला काय म्‍हणाला?

सामना संपल्‍यानंतर धोनी मला म्हणाला की, "आजची खेळी ही तुला म्हातारा झाल्‍यानंतरही स्‍मरणात राहिल. " असेही रायडू याने सांगितले. आयपीएल ट्रॉफी विजेता सहा संघात खेळण्‍याची संधी अंबाती रायडूचेला मिळाली. २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात त्‍याचा समावेश होत. तर २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात त्‍याच समावेश होता. अशा प्रकारे त्याने रोहित शर्माच्या सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्यार्‍या संघात असणारा खेळाडू या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

अंबाती रायडू आयुष्‍यातील पुढील टप्‍पा एन्‍जॉय करेल

फायनल सामन्‍यापूर्वी निवृत्ती जाहीर करणा्‍या अंबाती रायडूचे कौतूक करताना धोनी म्‍हणाला की, रायुडू जेव्हा मैदानात असतो तेव्हा तो नेहमी त्याचे शंभर टक्के देतो. त्‍याचे संघासाठी नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान असायचे. संपूर्ण कारकिर्दीत तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिला आहे. भारत अ दौऱ्यापासून मी बराच काळ त्याच्यासोबत खेळत आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाज दोन्ही बरोबरीने तो खेळू शकतो. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे. यंदाच्‍या आयपीएलमधील अंतिम सामना नेहमी त्‍याच्‍या लक्षात राहील असा आहे. तो देखील माझ्यासारखाच कमी फोन वापरणार आहे. त्याची कारकीर्द खूप चांगली आहे आणि मला आशा आहे की तो त्याच्या आयुष्याचा पुढचा टप्पा एन्जॉय करेल.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT