पुढारी ऑनलाईन डेस्क
साऊथ चित्रपटांचं राज्य संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीवर आहे. या स्टार्सच्या चित्रपटांवरदेखील उत्तर भारतातील दिग्दर्शकांच्या नजरा खिळल्या आहेत. महेश बाबू, प्रभास ते अल्लू अर्जुनपर्यंत या पुढील साऊथ स्टार्सविषयी (South Actors ) छोट्या-छोट्या गोष्टीदेखील जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. सध्या साऊथ सुपरस्टार्सना मिळणाऱ्या रकमेची मोठी चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉलीवूडचा प्रिन्स महेश बाबूने त्याचा चित्रपट सरकारू वारी पाटासाठी मोठी रक्कम घेतली आहे. रिपोर्टनुसार, महेश बाबू तिसरा हाएस्ट पेड अभिनेता झाला आहे. (South Actors )
समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, चित्रपट राधे श्यामसाठी साऊथ सुपरस्टार प्रभासने तब्बल १२५ कोटी रुपये घेतले होते. या लिस्टमध्ये तो टॉप पोझिशनवर पोहोचला आहे.
अल्लू अर्जुनने नुकताच रिलीज झालेला चित्रपट पुष्पासाठी ७५ कोटी रुपये घेतले आहेत. याचसोबत तो दक्षिणेचा दुसरा सर्वात हाएस्ट पेड अभिनेता बनलाय.
रिपोर्टनुसार, महेश बाबूने सरकारू वारी पाटा चित्रपटासाठी ७० कोटी रुपये घेतले होते. आता तो या यादीत तिसरा हाएस्ट पेड अभिनेता बनलाय.
विजय
रिपोर्ट्सनुसार, थलापति विजयने बीस्ट या चित्रपटासाठी एकूण ६५ कोटी रुपये चार्ज केले होते. ही रक्कम पाहून हा प्रश्न उपस्थित होतो की, मास्टर स्टारने आपला चित्रपट बीस्टसाठी मानधन का कमी केले होते? याआधी थलापति विजयने मास्टरसाठी जवळपास ८० कोटी रुपये घेतले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, पॉवर स्टार पवन कल्याणने भीमला नायक चित्रपट ६५ कोटी रुपयांत साईन केला होता. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
जेव्हा दिग्दर्शक एस एस राजामौलीचा चित्रपट आरआरआरसाठी अभिनेते ज्युनिअर एनटीआरलादेखील राम चरण या अभिनेत्यासोबतचं ५०-५५ कोटी रुपये घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी चित्रपट अन्नाथेसाठी एकूण ५० कोटी रुपये घेतले होते.
चित्रपट लायगरसाठी अभिनेता विजय देवरकोंडाने केवळ ३५ कोटी रुपये घेतले होते.