Latest

Dios-Covax : सर्व व्हेरियंटवर रामबाण लस येणार; त्याला सुईच नसणार!!!

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिका, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. इतकंच नाही तर देशातही ओमायक्राॅनचे ६१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या असतानादेखील ओमायक्राॅनची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. (Dios-Covax)

भविष्याचा विचार करता कोरोनाचे आणखी व्हेरियंट निर्माण होऊ शकतील, त्याचाच विचार भविष्यातील सर्व व्हेरियंटविरोधातील लसीची चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे ही लस नीडल फ्री (सुईचा वापर केला जाणार नाही) असणार आहे. केंब्रिड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि डिओसिनवॅक्सचे सीईओ जोनाथन हिनेय यांनी लसीची निर्मिती केली आहे.

एनआयएचआर साऊदम्पटन क्लिनिकल रिसर्चमध्ये या चाचण्या होणार आहेत. त्यात १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असणार आहे. यासंदर्भात जोनाथन होनेय म्हणाले की, "सध्या कोरोनाचे नवनवे व्हेरियंट येत आहेत आणि रोग प्रतिकारशक्तीदेखील कमी होताना दिसत आहे. अशावेळी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. डिओज-कोवॅक्स (Dios-Covax) लसीमध्ये अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही लस व्हेरियंट आणि कोरोनाविरोधात अधिक सक्षम आहे."

"कोरोनाच्या लसींवर आणि नव्या व्हेरियंटवर नव्या लसी या आधुनिक तंत्रज्ञानावर तयार व्हायला हव्यात. त्यांची चाचणी करण्यासाठी काही लोक तयार ठेवायला हवेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या नव्या विषाणुंच्या धोक्यापासून आपला बचाव होईल. जागतिक कोरोना लसीच्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकत आहोत. हा लस केवळ कोरोना व्हेरियंटपासूनच आपलं रक्षण करणार नाही, तर भविष्यातील कोरोना विषाणूंपासूनही आपलं रक्षण करणार आहे", असाही दावा जोनाथन हिनेय यांनी केला आहे.

पहा व्हिडीओ : थकलेल्या वृद्ध एसटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT