अलीया भट्ट 
Latest

Alia Bhatt : अलिया उर्फी कधीपासून झालीस? घाईत ब्लाउज उलटं घातलीस की काय !

backup backup

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन जोरात सुरू आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांचे डिसेंबरमध्ये होणारे लग्न आधीच चर्चेत आहे. दुसरीकडे, राजकुमार आणि पत्रलेखा यांचे लग्न चंदीगडमध्ये झाले. अशा परिस्थितीत आता आदित्य सील आणि अनुष्का रंजन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

अनुष्का, आदित्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी एक संगीत पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत आलिया भट्टही (Alia Bhatt) उपस्थित होती. अभिनेत्रीने तिच्या बोल्ड आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आलिया भट्टला आधुनिक शैलीतील लेहेंगा-चोलीमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिची जोरदार प्रशंसा केली, तर अनेकांनी तिला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आलिया भट्टचा हा ड्रेसिंग सेन्स काही लोकांना आवडला नाही. क्रॉस नेक ब्लाउजसह अभिनेत्री बॅकलेस अवतारात दिसली. आलिया भट्टने लाइम-ग्रीन आणि पिंक रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. आदित्य सील आणि अनुष्का रंजनच्या संगीत सेरेमनीमधील आलियाचे (Alia Bhatt) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनेकांना तिची स्टाईल आवडली असताना नेटिझन्सनी तिला तिच्या स्टाइलबद्दल ट्रोल केले. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, 'फॅशन डिझास्टर ऑफ द इयर अवॉर्ड मिस आलिया भट्टला (Alia Bhatt) मिळायला हवा.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'हे काय घातले आहे आलिया? फॅशनच्या नावाखाली काहीही. तिसर्‍याने लिहिले, 'घाईत ब्लाउज उलटा घातला.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT