Alia Bhatt 
Latest

Alia Bhatt : जणू बार्बी डॉलचं; आलिया – रणबीरनं दाखवला ‘राहा’ चा चेहरा (VIDEO)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) आणि रणबीर कपूर दोघेजण क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी आलियाने एका गोंडस मुलगी 'राहा' ला जन्म दिला. राहाच्या जन्मानंतर आलिया- रणबीरच्या चाहत्यांना तिची मुलगी 'राहा'चा चेहरा पाहण्यसाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, जन्मानंतर आलिया कधी-कधी राहासोबत अनेक ठिकाणी स्पॉट झाली होती, मात्र, तिने 'राहा'चा चेहरा स्पष्टपणे दाखवFला नव्हता. आता मात्र, दोघांनी किलर आणि स्पष्टपणे 'राहा' चा चेहरा पॉपाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ( Alia Bhatt )

संबंधित बातम्या 

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेजण नुकतेच त्याच्या बिल्डींगच्या खाली मुलगी 'राहा'सोबत स्पॉट झाले. यावेळी त्याच्यावर पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर पडली. परंतु, यावेळी खास करून 'राहा' आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कारण याआधी आलिया स्पष्टपणे कधीच मुलगाची चेहरा दाखविला नव्हता. मात्र, आता आलिया आणि रणबीरने किलर 'राहा'चा चेहरा दाखविला आहे. यावेळी राहा रणबीरच्या कडेवर तर आलिया रणबीरच्या बाजूला उभी होती. यावेळी तिघांनीही पॉपाराजीच्या कैमेऱ्याला हटके पोज दिली.

आलिया- रणबीरचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्राम अंकाऊंटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'राहा कपूरचे ख्रिसमस मुहूर्तावर पॉपाराझीला पोझ, आश्चर्यकारण सुंदर डोळे आणि गोंडस स्मित, 'राहा' आता पॅप्स फेव्हरेट होणार आहे ???♥️….' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. तर दुसरीकडे ५४ मिनिटांत व्हिडिओला १ लाख २७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजीदेखील शेअर केले आहेत.

( video : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT