Latest

Allu Arjun याचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ चा हिंदी ट्रेलर रिलीज

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'पुष्पा' चित्रपट सर्व भाषांमध्ये हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने ( Allu Arjun ) लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यात 'पुष्पा' च्या हिंदी भाषेतील चित्रपटाने त्याला संपूर्ण भारताचा सुपर स्टार केला आहे. आता अल्लू अर्जुनच्या या लोकप्रियतेच्या फायदा घेण्याचा विडाच त्याचा निर्मात्यांनी उचलला आहे. त्यामुळे तेलुगूमध्ये हिट ठरलेले त्याचे इतर सिनेमा हिंदीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच दृष्टीने मागील वर्षी हिट ठरलेला 'अला वैकुंठपुरामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला. तसेच पुढील महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांना पहाता देखिल येणार आहे.

'अला वैकुंठपुरामुलू' या चित्रपटात अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) सोबत अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)आणि तब्बू ( tabu ) देखिल मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच मराठीतील सचिन खेडकर ( Sachin Khedekar ) सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. 'पुष्पा'च्या यशानंतर हा चित्रपट हिंदीमध्ये चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित केला जाणार होता. पण याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बॉलिवूड मध्ये 'शहजादा' या नावाने बनविला जात आहे. तसेच यामध्ये कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) हा मुख्य भूमिकेत आहे. शहजादाचे दिग्दर्शक आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांनी गोल्डमाईन्स यांना विनंती केल्यावर 'अला वैकुंठपुरामुलू' हा चित्रपट सिनेमा गृहात रिलीज करण्याचे रद्द करण्यात आले.

'अला वैकुंठपुरामुलू' या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गोल्डमाईन्स प्रोडक्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन हा ट्रेलर शेअर केला आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना देखिल या चित्रपटाचा ट्रेलर आवडताना दिसतो आहे.

अल्लू अर्जुनचा 'अला वैकुंठपुरामुलू' हा सिनेमा त्रिविक्रम श्रीनिवास यांनी दिग्दर्शित केला आहे. मुळचा तेलगु सिनेमा २०२० साली प्रदर्शित झाला होता. तसेच तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत देखिल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तब्बल १६० कोटींची तुफान कमाई केली होती. २०२० सालातील हा सर्वात मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर साऊथच्या प्रादेशिक भाषेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आता 'अला वैकुंठपुरामुलू' हा चित्रपट हिंदीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी ढिन्चॅक या चॅनलवर पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT