akshaya deodhar-hardeek joshi 
Latest

Akshaya-Hardeek Marriage : शुभमंगल सावधान! अक्षया-हार्दिकचा विवाह सोहळा, पहा फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya-Hardeek Marriage ) आज २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. गेले ती-चार दिवस मेहंदी सोहळा, हळद आणि संगीत सोहळा पार पडला. यामध्ये या कपलने धमाल डान्सदेखील केला. प्रत्येक सोहळ्यातील अगणित क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले. आता लग्नविधीतील काही निवडक फोटो समोर आले आहेत. (Akshaya-Hardeek Marriage) स्वत: अक्षयाने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने फोटोंना कॅप्शन लिहिलीय की-  reel to Real✨ & Magical Forever..!♾️ #अहा❤️

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले. हार्दिक जोशीने राणादा ची भूमिका तर अक्षया देवधरने या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारली होती. राणादा आणि पाठकबाई यांची जोडी छोट्या पडद्यावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील पती-पत्नी रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नानंतर चाहत्यांनी त्यांना खूप साऱ्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT