Radhika Madan 
Latest

Radhika Madan : अक्षयच्या ‘सरफिरा’ ची घोषणा; ‘या’ तारखेला खिलाडीसोबत राधिका स्क्रिनवर (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या १० एप्रिल २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. दरम्यान एकीकडे या चिपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे अक्षयने त्याचा आणकी एका आगामी 'सरफिरा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषितल केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदानसोबत ( Radhika Madan ) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट साऊथ स्टार सुर्याच्या 'सोरारई पोटरू' चा रिमेक आहे.

संबंधित बातम्या 

'बेबी', 'एअरलिफ्ट', 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'स्पेशल २६' यांसारख्या धमाकेदार चित्रपटानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आगामी 'सरफिरा' चित्रपट घेवून येत आहे. नुकतेच अक्षयने 'सरफिरा' चित्रपटातील त्याचा एक व्हिडिओ शेअर करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये येत्या १२ जुलै रोजी अक्षयचा आणखी एक नवा 'सराफिरा' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अक्षयने "स्वप्न खूप मोठे आहे, ते तुम्हाला वेडा बनवतात! #सराफिरा फक्त १२ जुलै २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल." असे लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी अक्षयचे भरभरून कौतुक करताना अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता परेश रावल, राधिका मदन ( Radhika Madan ) आणि सीमा बिस्वास यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहेत.

तर ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार मोठ्या पडद्यावर आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट घेऊन येत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी केली आहे. या चित्रपटानंतर आता 'सरफिरा' चित्रपटाची घोषणा केली आहे. यामुळे अक्षयच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT