मुंबई : पुढारी ऑनलाईन – भारतातील प्रसिद्ध गुंतवणुकादर राकेश झुनझुनवाला यांचे पाठबळ असलेल्या अकासा एअर (Akasa Air) या विमानसेवेसाठी बुकिंगला सुरुवात झालेली आहे. ७ ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू होत आहे. या मार्गावर आठवड्यात २८ फ्लाईट्स असणार आहेत.
तर पुढच्या टप्प्यात १३ ऑगस्टपासून बंगळूर ते कोची या मार्गावर फ्लाईटस सुरू होतील. या मार्गावर एक आठवड्यात २८ फ्लाईटस उड्डाण घेतील. ही मार्गांसाठीची तिकीट विक्री २२ जुलैपासून सुरू होत आहे. मुंबईते अहमदाबाद मार्गावर बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस या फ्लाईटस असतील.
मुंबईत अहमदाबाद तिकीट ४,३१४ रुपयांपासून सुरू होते. तर अहमदाबाद ते मुंबई या मार्गावरील तिकीट ३९०६ रुपयांपासून सुरू होते.
कंपनीचे सीईओ विनय दुबे म्हणतात, "या कॅटग्रीत प्रवाशांना आतापर्यंत न मिळालेल्या अशा उत्तम सेवा आम्ही देणार आहोत. आमची विमानसेवा सुरू होत असल्याचा आम्हाला आनंद आहे."
मोठ्या शहरांना लहान शहरांशी जोडणे संपूर्ण भारतभर विमानसेवा विस्तारित करणे, असे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
बोईंग ७३७ मॅक्स ही विमाने कंपनीने घेतलेली आहेत. या विमानसेवेत खाद्यपदार्थ विकत घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी कॅफे अकासा ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पास्ता, व्हिएतनामिज रोल्स, हॉट चॉकलेट आणि भारतीय सण उत्सवात बनवले जाणारे खास पदार्थही मिळणार आहेत.
हेही वाचा