पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा हा विषय आता संपलेला आहे. अजित पवार यांच्याबद्दल बरेच गेैरसमज पसरवले जातात, असे शरद पवार यांनीच म्हटलं आहे. जे साहेबांचे मत ते आमचे मत आहे. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज (दि.७) आपली भूमिका स्पष्ट केली. (Ajit Pawar)
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल. आम्ही सर्व एकत्र आहोत. महाविकास आघाडीला कुठेही धक्का लागणार नाही. मी कामाचा माणूस आहे. मी स्थानिक काम करत होतो; पण मी दिल्लीला गेलो, अशा अफवा पसरवल्या गेल्या. त्याचबरोबर त्यांनी माध्यमांना संपूर्ण आठवड्याचा आपला कार्यक्रमांची माहिती देत कोणताही गैरसमज करु नये, असे आवाहनही केले.
हेही वाचा