मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सुनील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहेत. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांच्या 'अभिनंदन… अभिवादन' या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडले. या सोहळ्यात अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
विधीमंडळ किंवा विधीमंडळाच्या बाहेरची भाषणे ऐकल्यावर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याची सगळ्यांना खात्री पटते. साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विधीमंडळातील भाषण ऐकले तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आले की, त्यांच्या हातामध्ये कागदाची एक चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण करण्याची त्यांची शैली आहे. पवारसाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असेही अजित पवार म्हणाले.
लोकसभेचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या व आमदार पदाच्या काळात विधीमंडळात केलेल्या निवडक व अतिशय भावस्पर्शी भाषणांचे संकलन 'अभिनंदन… अभिवादन' या पुस्तकाच्या रुपाने प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते होणार होते, मात्र पवारसाहेबांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने आज त्यांना ॲडमिट व्हायचे असल्याने ते उपस्थित राहू शकले शकले नाहीत.
सुनील तटकरे यांची भाषणे ही सगळीच अभ्यासपूर्ण व भावस्पर्शी अशाप्रकारची होती. त्यांच्या असंख्य भाषणातून मोजकीच भाषणे या पुस्तकात निवडण्याचे अवघड काम केले गेले आहे. पुस्तक प्रकाशनाचा केलेला कार्यक्रम हा कौतुकास्पद आहे. तटकरे यांना न्याय देण्यासाठी एखादा महाग्रंथ देखील अपुरा पडेल असे मला वाटते. भविष्यात प्रयत्न केला तर महाग्रंथात रुपांतर करण्यास हरकत नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा