पुढारी ऑनलाइन डेस्क : Ajit Pawar Group Meet Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री धनंजय मुंडे, आदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भूजबळ यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे ही भेट घेण्यात आली आहे.
विधीमंडळाचे उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या एक दिवस आधी अजित पवार यांच्यासह गटाने शरद पवार यांची भेट घेत आहेत. देवगिरीच्या बंगल्यावरील बैठकीनंतर पहिल्यांदाच ही भेट घेण्यात येत आहे. यासोबतच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्ष प्रतोद जितेंद्र आव्हाड हे देखील वाय बी सेंटरला दाखल झाले आहेत. मात्र, ही बैठक नेमकी कशासाठी आहे, याविषयी जयंत पाटील यांनी मला काहीही माहित नसल्याचे सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला. जयंत पाटील म्हणाले मला फक्त बैठकीसाठी तातडीने पोहोचण्यासाठी सांगितले. त्यामुळे मला काहीच माहित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अनेक जण बैठकीविषयी आपआपले अंदाज बांधत आहेत. राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात नेमकी काय चर्चा होणार, काय खलबते होणार, शरद पवार यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नासाठी ही बैठक घेण्यात आली आहे का? अजित पवार गटाला शरद पवार यांनी बैठकीसाठी आमंत्रण दिले आहे का? अशा अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा :