नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी अजय भटनागर यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळ मंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. झारखंड कॅडरच्या १९८९ तुकडीचे आयपीएस अधिकारी भटनागर सध्या सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. आदेशानुसार सेवानिवृत्ती पर्यंत २० नोव्हेंबर २०२४ भटनागार या पदावर राहतील. (Ajay Bhatnagar)
Ajay Bhatnagar : २४ जुलै २०२३ पर्यंत पदावर
सीबीआयचे संयुक्त संचालक अनुराग यांची अतिरिक्त संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. २४ जुलै २०२३ पर्यंत ते या पदावर राहतील. गुजरात कॅडरमधील १९९४ तुकडीचे आयपीएस अधिकारी मनोज शशीधर यांना देखील तीन वर्षांसाठी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते तपास संस्थेत संयुक्त संचालक पदावर कार्यरत आहेत.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आयपीएस कार्यकाळ धोरणातून सवलत देत सीबीआयचे संयुक्त संचालक शरद अग्रवाल यांची प्रतिनियुक्तीचा काळ ३१ मे २०२३ पासून एक वर्षांसाठी अर्थात १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे, असे ही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.