Ajay Banga 
Latest

Ajay Banga : भारतीय वंशाच्या अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड; जो बायडन यांनी केली नियुक्ती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुरूवारी (दि.२३) अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड केली. जो बायडन यांनी यावेळी बोलताना बंगा यांच्या आर्थिक समावेशन करण्याच्या कौशल्याचे कौतुक केले. जागतिक बँकेने बुधवारी (दि.२२) सांगितले होते की, गेल्या आठवड्यात डेव्हिड मालपास राजीनामा जाहीर केला होता. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला नवीन अध्यक्ष निवडणे गरजेचे आहे. (Ajay Banga)

कोण आहेत अजय बंगा (Ajay Banga)

अजय बंगा हे भारतीय वंशाचे आहेत. मात्र, पुढे त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. अजय बंगा यांनी जनरल अटलांटिक या अमेरिकेच्या प्रायव्हेट इक्विटी फर्मचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मास्टरकार्डचे त्यांनी १२ वर्षे नेतृत्व केले. डिसेंबर २०२१ मध्ये ते मास्टरकार्डमधून निवृत्त झाले. (Ajay Banga) जिथे त्यांनी २०२५ पर्यंत १ अब्ज लोक आणि ५० दशलक्ष सूक्ष्म आणि लघु व्यवसायांना डिजिटल अर्थव्यवस्थेत आणण्याचे लक्ष्य ठेवले होते.

अमेरिकेचे जेनेट येलेन याबाबत बोलताना म्हणाले, मास्टरकार्डमधील बांगाचा अनुभव आणि हवामान उपायांमध्ये खाजगी भांडवल तैनात करण्याचे त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. (Ajay Banga) त्यांचे हे कौशल्य गरिबी दूर करणे आणि सामायिक समृद्धी वाढवण्याचे जागतिक बँकेचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT