Latest

Aap in Panjab : पंजाबात ‘आप’च्या विजयानंतर व्हायरल होतोय शाखरुख खानचा व्हिडिओ

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकींचे निकाल जवळ जवळ हाती आले आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये, गोव्यात भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये ( Aap in Panjab ) आपचे डंके वाजले आहेत. आम आदमी पक्षाने पंजाबात सत्ता काबीज केली आहे. विजयाकडे वाटचाल करत असताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP च्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा एक व्हिडिओ आप-आम आदमी पक्षाच्या (AAP) ( Aap in Panjab ) च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'चक दे ​​इंडिया' या चित्रपटातील आहे. जेव्हा भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवतो तेव्हा चित्रपटाच्या या दृश्यात दाखवण्यात आले आहे. त्यानंतर चित्रपटात कबीर खानची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानने अशी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओवर जोरदार कमेंट्स येत आहेत, कोणी अभिनंदन करत आहेत, तर कोणी मेम शेअर करत म्हणाले – शेवटी तो दिवस आला.

पंजाबमध्ये ( Aap in Panjab ) ऐतिहासिक आणि मोठा बदल घडला आहे. तेथे मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. शिवाय काँग्रेसचे बंडखोर नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना सुद्धा पराभवचा सामना करावा लागला आहे. आपच्या माध्यमातून सामान्य उमेदवार निवडूण आले आहेत. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, Punjab waalo tussi kamaal kar ditta भगतसिंह यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला जाणूनबुजून गरीब ठेवलं. पण, 'आप'नं बदल सुरू केला आहे. काँग्रेस आणि अकाली दल या दोन्ही पक्षांचा धुव्वा उडाला आहे. भाजप पंजाबमध्ये काँग्रेसला पर्याय उभा राहू शकतो हे सूत्र अयशस्वी ठरलं आहे.

पंजाबमध्ये झाला या दिग्गजांचा पराभव ( Aap in Panjab )

नवज्‍योत सिंग सिद्धू : अमृतसर पूर्व या मतदारसंघतून काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नवज्‍योत सिंग सिद्धू यांचा पराभव झाला. येथे आम आदमी पार्टीच्‍या जीवन ज्‍योत कौर यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला.

ओपी सोनी : ओपी सोनी से पंजाबचे उपमुख्‍यमंत्री होते. त्‍यांनी अमृतसर मध्‍य मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्‍यांचा आम आदमी पाटीच्‍या अजय गुप्‍ता यांनी पराभव केला.

अमरिंदर सिंग : पटियालामधून माजी मुख्‍यंमत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग रिंगणात होते. त्‍यांचा आम आदमी पार्टीचे अजित सिंग कोहली यांनी पराभव केला.

सुखबीर सिंग बादल : शिरोमणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल हे जलालाबादमधून निवडणूक लढवली. येथे आपचे जगदीप कंबोज यांचा विजय झाला.

प्रकाश सिंग बादल : शिरोमणी अकाली दलाचे दिग्‍गज नेते आणि माजी मुख्‍यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा पराभव झाला. येथे आपचे गुरमीत सिंह खुदियान यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

बिकम सिंग मजीठिया : शिरोमणि अकाली दलाचे नेते आणि नवज्‍योत सिंग सिद्धू यांचे प्रमुख विरोधी बिक्रम सिंग मजीठिया हेही अमृतसर पूर्वमधून निवडणूक पराभूत झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT