Sara Ali Khan 
Latest

Sara Ali Khan : बेडशीटचा ड्रेस घातलास काय?;’ZHZB’नंतर सारा येलो कपड्यामुळे ट्रोल…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' चित्रपट रिलीज होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६.२ कोटींची कमाई करत एकूण १२.२० कोटींचा आकडा पार केलाय. दरम्यान साराचा एक विमान तळावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे सारा अली खान ( Sara Ali Khan ) ट्रोल झाली आहे.

अभिनेत्री सारा अली खान ( Sara Ali Khan ) नुकतेच येलो रंगाच्या थ्रीपीसमध्ये विमानतळावर स्पॉट झाली आहे. मोकळ्या केसांची स्टाईलसोबत पिंक कलरची छोटी पर्स तिने यावेळी कॅरी केली होती. खास करून सारा विमान तळावरून तिच्या कारकडे हसत-हसत जाताना दिसली. यादरम्यानच ती पॉपाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'In love with the co-ord set!!? Sara Ali Khan looking great as usual even in the most comfy clothes!! Also hey! , Did you watch her new movie ?? ?'. असे लिहिले आहे.

सारा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. दरम्यान काही युजर्सना साराचा हा लूक आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांना साराचा हा लूक अजिबात आवडलेला नाही. दरम्यान एका युजर्सने 'बेडशीटचा ड्रेस घातलास काय?', 'ही फॅशन चांगली दिसत नाही', "जरा हटके जरा बचके' चित्रपटातील लूक आणि अभिनय आवडला', 'तशीच रहा'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत २३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT