second photo lalit modi with supermodel  
Latest

Lalit Modi : सुष्मिता सेननंतर ललित मोदी सुपर मॉडल उज्ज्वला राऊतच्या प्रेमात?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननंतर आता दिग्गज उद्योगपती ललित मोदी एका सुपर मॉडलच्या प्रेमात पडलीय. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ललित मोदी यांचे जे फोटो व्हायरल झाले होते, त्या फोटोंमध्ये सुष्मिता सेन खूप क्लोज दिसत होती. (Lalit Modi ) या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसले होते. आता ललित मोदी यांच्याविषयी नवे अपडेट समोर आले आहे. रिपोर्टनुसार, ललित मोदी एका सुपर मॉडलच्या प्रेमात असून दोघांचेही फोटो व्हायरल झाले आहेत. (Lalit Modi)

मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचा ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी आपापले मार्ग निवडले आहेत. आता ललित मोदी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भारताची दिग्गज सुपर मॉडल उज्ज्वला राऊतसोबत दिसत आहेत.

कोण आहे सुपर मॉडल उज्ज्वला राऊत?

सोशल मीडियावर ललित मोदी यांचा एक फोटो जो फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ते ब्लॅक सूटमध्ये दिसत आहेत. तर जिन्याच्या पायऱ्यांवर भारताची दिग्गज सुपरमॉडल्स उज्ज्वला राऊत बसलेली दिसते. फोटोमध्ये उज्ज्वला राऊत लवेंडर कलरच्या गाऊनमध्ये दिसतेय. फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.

प्रसिद्ध वकील आणि भारताचे सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी लंडनमध्ये तिसऱ्यांदा विवाह केला. लग्नानंतर ब्रिटिश कॅपिटलमध्ये एक आलिशान रिसेप्शनचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते. रिसेप्शन पार्टीमध्ये ललित मोदीदेखील हजर होते. त्यांचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले आहेत. याच रिसेप्शन पार्टीमध्ये ललित मोदी यांना ९० च्या दशकातील सुपरमॉडल उज्ज्वला राऊतसोबत पाहण्यात आले. आता म्हटले जात आहे की दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. पण, ललित मोदी -उज्ज्वला राऊत यांनी रिलेशनशीप विषयी कोणतीही पुष्टी केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT