परफॉर्मर ऑफ द इयर 
Latest

अदिती राव हैदरी, राजकुमार रावने पटकावला ओटीटी ‘परफॉर्मर ऑफ द इयर’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता राजकुमार रावने मुंबईत नुकत्याच झालेल्या ओटीटी अवॉर्ड शोमध्ये प्रतिष्ठित 'परफॉर्मर ऑफ द इयर' पुरस्कार पटकावला. विशेषत: अदितीला 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' आणि 'ज्युबिली' या दोन उल्लेखनीय वेबसिरीजमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. तर राजकुमारला 'गन्स अँड गुलाब्स' वेबसिरीज आणि 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर दोघांवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

संबंधित बातम्या 

'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' मध्ये अदितीने अनारकलीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भावनांची विस्तृत श्रेणी व्यक्त करण्याची तिची क्षमता आणि तिच्या भूमिकेची खोली या चित्रपटावर छाप सोडली. १९४० च्या दशकातील अभिनेत्री सुमित्रा कुमारी 'ज्युबिली' मध्ये अदितीने तिची अष्टपैलुत्व आणि तिच्या कलेबद्दल समर्पण दाखविले. यामुळे आदितीला ओटीटी अवॉर्ड शोमध्ये प्रतिष्ठित 'परफॉर्मर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला.

अदिती चित्रपटसृष्टीत चमकत असून तिचे अनेक उत्तम प्रोजेक्ट्स भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत आगामी मालिका 'हीरामंडी', विजय सेतुपतीसोबत 'गांधी टॉक्स' या मूक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर अदिती 'लायनेस' मधून हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

राजकुमार रावने पटकावला परफॉर्मर ऑफ द इयर

अभिनेता राजकुमार रावला राष्ट्रीय आयकॉनने 'गन्स अँड गुलाब्स' या वेबसिरीज आणि 'मोनिका, 'ओ माय डार्लिंग' या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओटीटी अवॉर्ड शोमध्ये प्रतिष्ठित 'परफॉर्मर ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.

वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची राजकुमार रावची क्षमता ही कायमच उल्लेखनीय ठरली आहे. 'गन्स अँड गुलाब्स' मधील एक करिश्माई मेकॅनिकमधून गुंड बनलेल्या पाना टिपूची भूमिका आणि 'मोनिका', ओ माय डार्लिंग' मधील रोबोटिक्स तज्ञ म्हणून त्याच्या भूमिकेची खूपच कौतुक झाले. राजकुमार राव 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ', 'स्त्री २', आणि 'SRI' हे आगामी प्रोजेक्ट्स घेवून येणार आहे. यानंतर दोघांवर सोशल मीडियातून भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT