बिग बॉस मराठी : रहिवाशी संघात आदिश वैद्य याची धमाकेदार एन्ट्री  
Latest

बिग बॉस मराठी : आदिश वैद्य याची धमाकेदार एन्ट्री

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बिग बॉस वेगवेगळे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद – विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचे विषय आहेत. प्रेक्षकांना कालच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री झालीय. सगळ्यांचा लाडका आदिश वैद्य वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये दाखल झालाय. आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल ? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का ? कोणत्या गृपचा आदिश वैद्य सदस्य होणार ? तो त्याचा ग्रुप तयार करणार की, स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमामधील स्पर्धक तर चर्चेत आहेतच. जसे दादुस यांचा दिलखुलास अंदाज, ग्रुप ए, ग्रुप बी आणि घरात झालेला नवा ग्रुप सी म्हणजे क्लिअर, विशाल आणि विकासची मैत्री. जयचा बेधडक अंदाज, मीनलची बडबड, सदस्यांची टास्क जिंकण्याची जिद्द. घरामध्ये बनलेले हे गट तसेच महेश मांजरेकर यांची बिग बॉसची चावडी. आता वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आदिश बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यावर सदस्य नक्की काय बोलतील कसे त्याचे स्वागत होईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

आदिशने घरातील सदस्य तसेच त्याला कोण आवडते, कोणाशी मैत्री होईल? याबद्दल तो म्हणाला-खूप उत्सुक आहे घरामध्ये जायला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीने खेळायचा प्रयत्न करतो आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेत. असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही; पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विजेता म्हणूनच मला बाहेर यायला नक्की आवडेल.

आता पुढील आठवड्यामध्ये प्रेक्षकांना घरामध्ये काय काय बघायला मिळणार आहे ? कोणत्या प्रकारचे टास्क असणार आहेत ? हे पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT