Latest

जय बजरंगबली… हनुमान जयंती निमित्त ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्‍टर रिलीज

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अभिनेता प्रभासची मुख्‍य भूमिका असणार्‍या बहुचर्चित आदिपुरुष चित्रपटाचे पहिले पोस्‍टर नुकतेच रिलीज झाले होते. यानंतर आज हनुमान जयंती निमित्त या चित्रपटाचे नवीन पोस्‍टर रिलीज करण्‍यात आले आहे. सोशल मीडियावर या पोस्‍टरला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हनुमान हे प्रभू श्री रामाचे निस्सीम भक्त होते. राघवप्रती त्याचे शौर्य आणि पराक्रम दाखवणार्‍या पोस्टरमध्ये देवदत्त नागे श्री बजरंगबलीच्या भूमिकेत दिसत आहेत. या पोस्‍टर रिलीजमुळे हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह आणखीनच वाढवला असल्‍याच्‍या प्रतिक्रिया चाहत्‍यांकडून व्‍यक्‍त होत आहे.

अभिनेता प्रभासने साकारलेल्‍या बाहुबली चित्रपटातील मुख्‍य भूमिका चाहत्‍यांच्‍या पसंतीस उतरली होती. मात्र, बाहुबलीनंतर प्रभासचा एकही चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही. आता त्‍याचे चाहते आदिपुरुष चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्‍गदर्शन ओम राऊत करत आहेत. हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आणि रावणची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. चित्रपटाचा पहिला टीझर गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता.


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT