पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सावंतने तिचा पती आदिल खान दुरानीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आदिल खान पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा जामिन फेटाळल्याचा दावा राखीने केला आहे. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला जामिन मिळाला नाही. त्याला थेट कस्टडी, तुरुंगात पाठवले आहे. वकील आणि पोलिस त्यांचे काम करत आहे. मला न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.
राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यामध्ये वाद वाढला आहे. आता दोघांमधील नाते बिघडले असून राखीने आदिलवर मारहाणीचा आरोप केला आहे. शिवाय त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी आदिलविरोधात एफआयआर दाखल केले. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत आदिल दुर्रानीला ताब्यात घेतले होते. त्याला कोर्टात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, राखी सावंतची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.