पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव ( Kalyani Jadhav ) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा येथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे 'प्रेमाची भाकरी' नावाने एक हॉटेल कल्याणी जाधवने सुरू केले होतं. या हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना तिला एका डंपरने धडक दिली. यातच तिचा मृत्यू झाला. छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जिव रंगला', 'दख्खनचा राजा जोतिबा', 'सुंदरी' या गाजलेल्या मालिके तिने काम केले आहे. ( Kalyani Jadhav )
हेही वाचलंत का?