पुढारी ऑनलाईन डेस्क : 'साथ निभाना साथिया' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अपर्णा काणेकर ( Aparna Kanekar ) यांचे निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती अपर्णा यांची सहकलाकार लव्हली सासन हिने सोशल मीडियावर दिली आहे. त्याच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती.
संबंधित बताम्या
अभिनेत्री लव्हली सासन हिने तिच्या इंन्स्टाग्रामवर अपर्णासोबतचा एक फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. या फोटोच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आज माझे मन खूप भरुन आलं, कारण माझ्या सर्वात जवळची असणारी अभिनेत्री अपर्णा काणेकरचे निधन झाले. तू माझ्या ओळखीची सर्वात सुंदर आणि खंबीर व्यक्ती होतीस. सेटवर आपण एकत्रित सुंदर वेळ घालवल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे. हा वेळ मी कधीच विसरणार नाही. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. प्रत्येकजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझी खूप आठवण येईल…'
ही पोस्ट सोशल मीडियावर पसरताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'साथ निभाना साथिया' या मालिकेत त्यांनी तब्बल पाच वर्ष काम केलं होतं. मालिकेत त्यांनी 'जानकी बा' ची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीपासून ते तान्या शर्मापर्यंत 'साथ निभाना साथिया' च्या टिमने शोक व्यक्त केला. ( Aparna Kanekar )