rajkumar rao 
Latest

अभिनेता राजकुमार राव ठरला “परफॉर्मर ऑफ द इयर”चा मानकरी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील पॉवरहाऊस टॅलेंट म्हणजे राजकुमार राव! याला नुकत्याच झालेल्या ग्रॅझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी हा खास पुरस्कार त्याला देण्यात आला.

२०१० मध्ये राजकुमार राव ने त्याच इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत राजकुमार रावने आपल्या कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिका या सहज सुंदर होत्या. काय पो छे, क्वीन, न्यूटन आणि स्त्री ही त्याची फिल्मोग्राफी या कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. राजकुमार रावांचे यश एवढ्यावर न थांबत गेल्या वर्षी त्याने लागोपाठ तीन चित्रपट केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. यावर्षी त्याने भीडमध्ये साकारलेल्या भूमिकेने पुन्हा एकदा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

त्याच्या बहुप्रतीक्षित स्त्री २ च्या चर्चा सर्वत्र असून २०२३ मध्ये तो अनेक हटके चित्रपट करणार आहे. हा स्टार पुन्हा बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणार आहे. मनमोहक मिस्टर आणि मिसेस माही, अ‍ॅक्शन-पॅक्ड गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांच्या प्रेरणादायी बायोपिकसाठी असे अनेक चित्रपट राजकुमार करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT